नगर (प्रतिनिधी)- भाजप, शिवसेना महायुतीबरोबर सत्तेत गेलेले राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा वारसा सोडलेला नाही. मोर्चे, आंदोलनातून समाजाला न्याय मिळत नाही, सत्तेत येऊन समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. तर मुस्लिम समाजाला हक्क मिळवून देण्याचे काम ते सातत्याने करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी केले.
शहरात राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना नायकवडी बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवडी, कार्याध्यक्ष मोबीन सिद्दिकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. माणिक विधाते, अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, माजी नगरसेवक आरिफ शेख, राष्ट्रवादी ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी विधानसभा युवक अध्यक्ष सागर गुंजाळ, राष्ट्रवादी विद्यार्थी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, राष्ट्रवादीचे नेते साजिद मिर्झा, शाहनवाज शेख, अब्दुल खोकर, शहबाज बॉक्सर, सय्यद मारूफ, सय्यद फरीद, मतीन ठाकरे, फिरोज पठाण, वसीम शेख, ताज खान, शाहरुख शेख, जाकिर तांबोली, जीशान शेख, किशोर पवार, इसाक शेख, सचिन पवार, अजित शेळके, आबिद शेख, प्रशांत बनसोडे, हंजला खान, फैजान शेख, अमन तांबोळी, सद्दाम तांबोळी, राकिब शेख, मुजफ्फर शेख, बेहजाद खान, शहजाद खान, ताऊस शेख, कामरान शेख, अदनान शेख, अन्वर शेख, सोहेल शेख, सोहेल सय्यद, सिराज शेख आदींसह मुस्लिम समाजातील युवक व अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे नायकवडी म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम समाजाला संरक्षण व शैक्षणिक सुविधा देण्याचे काम केले. तर युवकांना प्रवाहात आणण्यासाठी मौलाना आझाद विकास महामंडळासाठी 30 कोटीची असलेली तरतुद 1200 कोटी रुपये पर्यंत करुन एकप्रकारे न्याय दिला. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी मौलाना आझाद शैक्षणिक शिष्यवृत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ केली. अहमदनगर शहरासह इतर ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पुन्हा विधानसभेत पाठविल्यास त्यांना बळ मिळणार आहे. तर मुस्लिमांच्या 5 टक्के आरक्षणाचा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गाजावाजा न करता ते अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचे काम करत आहे. राज्यात कोठेही मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होत असल्यास ते धावून जाऊन त्यांना संरक्षण व न्याय देण्याचे काम करत असल्याचे सांगून, नायकवडी यांनी राम मंदिर सोहळ्याप्रसंगी मीरा-भार्इंदर येथील मिरवणुक, विशाळगड प्रकरण आदी उदाहरणे देऊन त्यांनी मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तर ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भरभरून मते घेतली, ते मात्र समाजाची परतफेड करु शकले नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन चालणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांच्या पाठिशी विधानसभा निवडणुकीत एकवटण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
प्रास्ताविकात साहेबान जहागीरदार म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांनी अल्पसंख्याक समाजाच्या नगरसेवकांना व युवकांना नेतृत्व देण्याचे काम केले. विविध पदाच्या माध्यमातून संधी दिली आहे. तर मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्या परिसराचा चेहरामोहर बदलला आहे. दोन वेळा आमदार असून देखील मंत्रीपदापासून ते वंचित आहे. त्यांना 50 हजाराच्या मताधिक्याने निवडून आणून मंत्रिमंडळात पाठविण्याचा अल्पसंख्याक समाज निर्धार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. लोकसभेत झाले ते विधानसभेला करणे चुकीचे ठरणार आहे. आमदार जगताप यांनी मागील 25 वर्षात रखडलेल्या विकासाचा बॅकलॉग भरून काढला. गाडी रुळावर आली असून, त्यांना पुन्हा संधी देण्याची आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. जातीयवादाचे राजकारण करुन अपप्रचार सुरु झाला असून, ज्या प्रमाणे मुकुंदनगर भागातून त्यांना मताधिक्य मिळाले. त्याचप्रमाणे मुस्लिम बहुल भागातून त्यांना मताधिक्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपत बारस्कर म्हणाले की, शहरात आमदार संग्राम जगताप यांनी जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. मुस्लिम समाजासह सर्व समाजाला एकत्र घेऊन ते विकासात्मक व्हिजनने पुढे जात आहे. मात्र निवडणूक जवळ आल्याने समाजात जातीय विष पेरण्याचे काम विरोधक करत असल्याचे त्यांनी सांगितले. वैभव ढाकणे यांनी मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे काम आमदार जगताप यांनी केले आहे. मात्र काही विघ्नसंतोषी राजकीय मंडळी युवकांचे माती भडकवण्याचे काम करत आहे. शहराच्या उज्वल भविष्यासाठी पुन्हा जगताप यांना आमदार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार केला पाहिजे, असे ते म्हणाले. अमित खामकर म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाच्या वस्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व कब्रस्तानसाठी मोठा निधी आमदार जगताप यांनी उपलब्ध करून दिला. मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे त्यांच्या माध्यमातून झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय साबळे यांनी केले. आभार शाहनवाज शेख यांनी मानले.
आ. संग्राम जगताप यांच्या पाठिशी ठाम उभे राहण्याचा अल्पसंख्यांक समाजातील युवकांचा निर्धार
- Advertisement -