लोकसभा निवडणूक निकालात महाराष्ट्रात महायुतीची मोठी पिछेहाट झाली आहे. या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली. या नंतर आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. पवार यांनी म्हटले आहे की, भाजपसह फोडलेल्या दोन्ही मित्रपक्षांची संख्या एक आकडी करून दाखवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब आपलं त्रिवार अभिनंदन! हाच #पराक्रम आता विधानसभेलाही करून दाखवा, त्यासाठी आपणास आगाऊ शुभेच्छा!
https://x.com/RRPSpeaks/status/1798030430748529011
देवेंद्र फडणवीस साहेब आपले त्रिवार अभिनंदन…. रोहित पवारांचा खोचक टोला…
- Advertisement -