विजयानंतर पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचलेले निलेश लंके यांनी याच इंग्रजीच्या मुद्द्यावरुन सुजय विखेंना टोला लगावला आहे.दिल्ली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी नवीन आहे. दिल्ली आणि लोकसभा दोन्ही माझ्यासाठी नवी आहे. माझ्या मतदार संघातील जनतेने मला संधी दिली, स्वप्नात पाहिलेली दिल्ली आणि आता आज संसदेत जाण्याचा भाग्य मिळतं आहे, असे खासदार निलेश लंके म्हणाले. तसेच मी इंग्रजी शिकणार आहे, ज्याला जस समजेल तस उत्तर द्यावं लागेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
“तसेच विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी शुभेच्छा दिल्या नाहीत मात्र त्यांच्या शुभेच्या सोबत आहेत अस गृहीत धरायचं. कांदा, दूध, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते लोकसभेत मांडणार. मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे, राजमार्गने पुढे जाऊन यश मिळवायचं आहे,” असेही निलेश लंके यावेळी म्हणाले.