अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह टीकेवर, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

0
1677

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलगी खासदार सुप्रिया यांच्यावर टीका करताना अतिशय गलिच्छ वक्तव्य केलं. त्यांच्या टीकेनंतर राज्यभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तारांच्या गलिच्छ टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. सत्तारांनी माफी मागावी, अशी मागणी केली जातेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. या सगळ्या घडामोडींवर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
अखेर या प्रकरणी सुप्रिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. खरंतर त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विधानावर बोलणंच टाळलं आहे. “मी या प्रकरणावर बोलणार नाही. अब्दुल सत्तारांवर मी बोलणार नाही”, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिलीय