पुण्यात नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार घडला आहे. पुण्यात लेखक नामदेव जाधव हे भांडरकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्यांनी नामदेव जाधवांना काळ फासल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळ फासण्यात आलं आहे.
पुण्यात आज लेखक नामदेव जाधव यांचा दिवाळी भांडारकर इन्स्टिट्यूट येथे कार्यक्रम होता. सिंगापूरमध्ये शिवजयंती साजरी होणार आहे, या विषयावर आधारित कार्यक्रमाचा विषय होता. मात्र, डेक्कन पोलिसांनी नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.
VIDEO: शरद पवार समर्थकांनी नामदेव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं pic.twitter.com/8ieIZaGwJA
— Pravin Sindhu Bhima Shinde 🇮🇳✊ (@PravinSindhu) November 18, 2023