Wednesday, April 30, 2025

आधी पार्थ पवारांना निवडून आणा, अजित पवारांना ओपन चॅलेंज…

सध्या महाराष्ट्रात शिरुर लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हान दिले आहे. त्यानंतर राज्याचे राजकारण कमालीचे तापले आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुरमध्ये पराभूत करून अजित पवार गटाचा उमेदवार निवडून आणणार असे आव्हान दिले आहे. अजित पवारांनी हे आव्हान दिल्यानंतर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी थेट अजित पवारांना त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडून आणून दाखवण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे. मोर्चादरम्यान पुणे जिल्ह्यातील खेड येथे सभा पार पाडली यावेळी बोलताना विकास लवांडे म्हणाले की, “अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजून तुमचा उमेदवार फिक्स झाला नाही. अजित पवार उभा राहण्यासाठी याला त्याला काड्या करत आहेत. अजितदादा तुम्ही म्हणालात ना दिलीप वळसे पाटील यांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे विजयी झाले तर आता तुम्ही दिलीप वळसे पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे करा, मग आपण पाहूच काय होतंय. असेल हिम्मत तर लढाच”. अजित पवारांनी पार्थ पवार यांना पुन्हा मावळमध्ये उभा करावे आणि यावेळेस तरी निवडून आणून दाखवावे मग बाकीच्या गप्पा माराव्यात, असे थेट ओपन चॅलेंजच लवांडे यांनी अजित पवारांना दिले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles