उपमुख्यमंत्री अजित पवारही प्रत्येक विरोधी उमेदवाराला पाडू असं म्हणत आहेत. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्यात बोलत होते. ते म्हणाले, “आम्ही मेलो तरी, रक्ताचे पाट वाहिले तरीही या देशाचे संविधान बदलू देणार नाही, या देशाची लोकशाही बदलू देणार नाही. ठाण्यात ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दारी आहे. माझी निष्ठा तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल. मी एकटाच तलवार घेऊन लढत असतो. मजा येते लढायला. आणि समोर दिग्गज अजिदादांसारखा असले तर अजून लढायला आवडतं.”
ते आता ढोस देत सुटलेत. तुला पाडेन, तुला पाडेन. मग तुझ्या पोराला का निवडून आणला नाही. लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता?” असा सवालही त्यांनी विचारला