अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्या प्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“छगन भुजबळ जेलमध्ये असताना लवकर जामीन मिळावा, यासाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” असा मोठा गौप्यस्फोट रमेश कदम यांनी केला आहे. पंढरपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
कदम म्हणाले,”जेलमध्ये असताना छगन भुजबळ हे नाराजी बोलून दाखवत होते. माझा जामीन लवकर झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल,असे सांगत होते. तुरुंगात असल्यावर छगन भुजबळ हे रोजच आजारी पडत होते. त्यांना रोजच उपचाराची गरज होती. पण आता छगन भुजबळ हे चांगलेच फिट आहेत.
जेलमध्ये गेल्यावरच ते आठ दिवसांतच आजारी पडले. छातीत दुखतंय ही कारण दाखवून जामिनासाठी नेत्यांची, पक्षांची सहानुभूती मिळवायचे. परंतु आता ते फिट दिसतात,” असा टोला रमेश कदमांनी लगावला आहे.