Sunday, July 14, 2024

पावसाळी अधिवेशनात निधी मिळताच अजित पवार गटाच्या आमदाराची ‘घरवापसी’

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात काहीही आलबेल नसून विधानसभेला निवडून कसे यायचे याची विद्यामान आमदारांना चिंता आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील निधी वाटपावर डोळा ठेवून बरेच आमदार तिकडे थांबलेले आहेत. एकदा निधी मिळाली की अजित पवार गटातील किमान १९ आमदार मूळ पक्षात परततील, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’च्या जागावाटपात पक्षाला ८५ जागा हव्यात असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेश कार्यालयात सोमवारी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित पवार यांचा पक्षात कुणावरही विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी घरात आपल्या पत्नींना राज्यसभेची उमेदवारी दिली असावी. मोदी यांच्याबरोबरच्या बहुतांश बैठकांना प्रफुल्ल पटेल असतात. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत की प्रफुल्ल पटेल आहेत, असा मला प्रश्न पडला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles