लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला फारसे यश मिळणार नाही, असे सांगितले जात असतानाच त्यांनी १० पैकी ८ जागा जिंकून अनेकांना बोटं तोंडात घालायला लावली. निकालानंतर कोल्हापूरात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापूरी शैलीत शरद पवारांची स्तुती करताना विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे.
कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरच्या दाभोळकर चौक परिसरात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. “सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं…”, असा एका ओळीचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. शरद पवारांचा फोटो आणि एका बाजूला पक्षाचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्हही आहे. रात्री हे बॅनर लागल्यानंतर याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं,राष्ट्रवादीने भाजपासह अजित पवार गटाला डिवचलं..व्हिडीओ
- Advertisement -