Wednesday, April 17, 2024

आ.निलेश लंके यांची घरवापसी?…शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्वत: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. असे अनेक लोक आमच्या पक्षात येण्यास इच्छूक आहेत, अनेकांची चर्चा आहे.

मात्र, लंके यांच्याबाबतीत यात काहीही तथ्य नाही, असे म्हणत पवार यांनी सकाळी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही चर्चा फेटाळून लावली. आज सकाळपासून जोरदार सुरू असलेली ही चर्चा शरद पवार यांनी एका वाक्यात फेटाळून लावली. ही चर्चा मला तुमच्याकडूनच कळते आहे, असेही पवार म्हणाले.आमदार नीलेश लंके आज घरवापसी करणार असल्याचं बोललं जात होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून लंके पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याची चर्चा होती. तसं झालं असतं तर परतीच्या मार्गाने आलेले लंके पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले असते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles