आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जास्ती जास्त जागांवर लढेल असा दावा आणि विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी आत्ताच संख्या सांगणार नाही अन्यथा त्यावर चर्चा सुरु हाेईल असेही स्पष्ट केले.सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे जयंत पाटील हे एका सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले सगळे होते त्यावेळी चार खासदार निवडुन आले होते. आता जवळपास सगळे कमी झाले. त्यामुळे चार-पाच होतील असं वाटलं होतं पण मतदान चाराचे 8 झालेत असा अप्रत्यक्ष टाेला जयंत पाटलांनी अजित पवार गटाला लगावला.