Tuesday, April 23, 2024

राजकारणात मोठी खळबळ…. राष्ट्रवादी ,शिवसेना कमळाच्या चिन्ह्यावरच निवडणूक लढवणार

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय. अजित पवार आणि शिंदे गट लोकसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय. बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आमची राजकीय मैत्री फक्त विकास कामासाठी आहे, आमची राजकीय बांधिलकी कोणासोबत नाही. आमची राजकीय बांधिलकी जनता आहे ते म्हणेल तर त्यांच्यासोबत जाऊ, असंही ते म्हणालेत.
लोकसभा निवडणुकीवरुन बोलताना बच्चू कडू यांनी राजकीय खळबळ उडवून देणारा दावा केलाय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना किती जागा भेटेल? भाजप अजित पवार यांना देईल की शिंदे गट देईल? किंवा होऊ शकते की भाजपचं सगळ्याच जागा लढवेल फक्त माणसं शिंदे आणि अजित पवारचे राहतील, आणि चिन्ह कमळ राहू शकते, असा दावा त्यांनी केलाय. शिवसेनेने 18 जागा लढवल्या होत्या आणि आता जर भाजप 35 जागा लढवत असेल तर मग शिंदे साहेबांची शिवसेना दिसली पाहिजे की नाही? सोबत घेऊन जर बगलीत दाबून ठेवाल तर बिचवा काढायची वेळ याला नको असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय.
लोकसभा निवडणूक आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा निवडणूक आमच्यासाठी प्रथम आहे. विधानसभेची बोलणी नाही तर मग 400 पार च्या वाट्यात आमच्या काय संबंध येतो. महायुतीच्या बैठकींचं मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तरी जायची इच्छा नाही. सध्या लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नाही, आमची मानसिकता विधानसभेची फक्त अमरावती किंवा अकोलामध्ये निवडणूक लढू असं बच्चू कडू म्हणालेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles