विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळतात. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना राज्यपानियुक्त आमदारांमध्ये संधी देऊ, असे सांगण्यात आले होते. पण मविआचे सरकार कोसळल्याने शिवाजीराव गर्जे यांची विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा अधुरी राहिली होती. परिणामी त्यांना यावेळी संधी मिळू शकते. तर राजेश विटेकर यांनी लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा महादेव जानकर यांना सोडण्यासाठी माघार घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांनी विटेकर यांना, ‘विधानपरिषदेवर संधी देऊ’ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता राजेश विटेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळू शकते. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही मंगळवारी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
मूळचे नगर जिल्ह्यातील शिवाजीराव गर्जे यांना विधान परिषदेची संधी !… अजित पवार गटाकडून हालचाली
- Advertisement -