राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मोठ्या भुकंपाचे संकेत दिले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जायच्या तयारीत आहे, असा दावा सुनिल तटकरे यांनी केला आहे. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत सुनिल तटकरे यांनी हा दावा केला आहे. मागच्या काही दिवसांपासून आमदारांकडून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, आमदार पक्षांतर्गत नाराजीतून पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत असल्याचा दावा सुनिल तटकरे यांनी केला आहे.