महाविकास आघाडी सरकार पडल्यावर अजित पवार यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी पत्रावर मी सही केली होती. पण, भाजपाबरोबर जाण्यासाठी त्या पत्राचा वापर करण्यात आला. ही सरळ-सरळ चोरी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली होतीय याला खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नुकतेच राजकारणात पदार्पण झालेल्यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा तटकरेंनी रोहित पवारांना दिला आहे.
‘एबीपी माझा’शी संवाद साधताना तटकरे म्हणाले, “राहुल गांधींनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेपेक्षा रोहित पवारांच्या ‘संघर्ष’ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यातून मिळालेला आत्मविश्वास नैराश्याच्या माध्यमातून लपवता येत नाही. तेव्हा आरोप करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. नुकतेच राजकारणात पदार्पण झालेल्यांनी सूर्यावर थुंकण्याचा आणि अजित पवारांवर आरोप करण्याचा प्रयत्न करू नये.”