उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना सोडून शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवारांच्या गटाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आज युगेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टने लक्ष वेधलं आहे. युगेंद्र पवार यांनी शरद पवारांबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. त्याला त्यांनी कॅप्शन दिली आहे ‘दिल्लीपुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकविलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय.’ अशी पोस्ट युगेंद्र पवार यांनी केली आहे. जी चांगलीच चर्चेत आहे.