कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरच्या नेप्ती उपबाजार समितीचे नेप्ती उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदास एकनाथ कोतकर नामकरण समारंभ सोहळा गुरुवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार अरुण जगताप, माजी सभापती भानुदास कोतकर, माजी आमदार नामदेव पवार, माजी आमदार आण्णासाहेब माने, उद्योजक मंगलदास बांदल, सचिन कोतकर, संचालिका सुरेखाताई कोतकर, माजी उपहापौर सुवर्णाताई कोतकर, सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, युवा नेते अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, चेअरमन विलास शिंदे, रावसाहेब पाटील शेळके, संतोष म्हस्के, अविनाश घुले, सहसचिव सचिन सातपुते यांच्यासह बाजार समितीचे संचालक, कर्मचारी, केडगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील
नेप्ती उपबाजार समितीमध्ये गुरुवारी विविध कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. यात कांदा बाजार भाव डिजीटल फलकाचेही अनावरण करण्यात आले. या कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर कांद्याचा आजचा भाव 38 रुपये असल्याचे पहावयास मिळाले. हे सांगतानाच हाच भाव लोकसभेपूर्वी 14 रुपये होता. त्यावेळीच कांद्याला भाव 38 रुपये असता तर मी माजी झालोच नसतो असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले. इंग्रजीच महत्व त्यावेळी मी पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतू लोकांना ते पटलं नाही आज ते कळाले. संचालक मंडळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करेल असा विश्वास व्यक्त करत मी तूमच्या सोबत असल्याचे सांगितले. आता माझ्याकडे खूप वेळ आहे. आता फक्त कार्यक्रम करायचे आहेत असे डॉ. विखे पाटील म्हटल्याने सभेत एकच हशा पिकला.