Friday, February 23, 2024

नगर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या सोसायटीची निवडणूक बिनविरोध, माजी मंत्री कर्डिले गटाचे वर्चस्व

नगर :नेप्ती ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; उपसरपंच संजय जपकर
अहमदनगर -नगर तालुक्यातील राजकीय दुष्टया महत्वाच्या असणाऱ्या नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक माजी सरपंच विठ्ठल जपकर, उपसरपंच संजय आसाराम जपकर, माजी पंचायत समिती सदस्य किसन होले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, बाबासाहेब होळकर,मार्केट कमिटी माजी संचालक वसंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली. या सोसायटीवर माजी आ. शिवाजी कर्डीले गटानी वर्चस्व मिळवले.
उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर माघारीपर्यंत जय बिरोबा ग्राम विकास पॅनलने निवडणूक प्रक्रिया हातळली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जय बिरोबा ग्राम विकास पॅनल चे दोन उमेदवार बिनविरोध झाले. उमेदवार अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भरलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन जय बिरोबा ग्राम विकास पॅनलचे सर्व १३उमेदवार बिनविरोध निवडून आले . म्हणजे ही निवडणूक १३/० अशी झाली. या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार कर्जदार प्रतिनिधी – मच्छिंद्र होळकर, दशरथ जपकर, राजेंद्र जपकर, विलास जपकर, राजाराम जपकर, अशोक जपकर, उमर सय्यद, सुरेंद्र होळकर अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी – सुरेश कदम महिला राखीव प्रतिनिधी – मुक्ता कांडेकर, रोहिणी होळकर, इतर मागास वर्ग प्रतिनिधी – जालिंदर शिंदे ,विभक्त जाती भटक्या जमाती – सादिक पवार. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नेप्ती फाट्यापासून गावात सी.डी च्या गजरात ,गुलाल उधळून ,फटाके फोडून भव्य मिरवणुक काढण्यात आली.

नेप्ती ग्रामस्थांनी मोठा विश्वास ठेवून प्रथम ग्रामपंचायत व आता विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या दोन्ही संस्था आमच्या ताब्यात देऊन एक हाती सत्ता दिली आहे. व विरोधकाचा धुवा उडवला आहे .त्याबद्दल ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून ग्रामस्थांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर टाकलेला आहे. ग्रामस्थांना बदल हवा होता. त्यानुसार त्यांनी कौल दिला आहे. ग्रामस्थांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे .या संधीचे सोनं करणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या सहकार्याने, गावाचा कायापालट करणार आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाला थोडाही तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन नेप्तीचे उपसरपंच संजय आसाराम जपकर यांनी केले.
प्रसंगी सरपंच संजय अशोक जपकर, माजी सरपंच दिलीप होळकर साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, प्रा.एकनाथ होले, ग्रामपंचायत सदस्य फारुक सय्यद, दादू चौगुले, संभाजी गडाख, एकनाथ जपकर, बंडू जपकर, रामदास फुले, रामराव कांडेकर, मल्हारी कांडेकर ,भानुदास फुले, गुलाब होळकर, जावेद सय्यद, पाराजी होळकर, बबन कांडेकर,हरिभाऊ पुंड, बबन फुले, पोलीस पाटील अरुण होले, महिंद्र चौगुले, भास्कर जपकर, सोमनाथ जपकर, अतुल जपकर, ज्ञानदेव जपकर,, बंडु कांडेकर, नाथा जपकर, प्रकाश जपकर, शिवाजी गाडेकर, योगेश होळकर ,नवनाथ चौरे, नानासाहेब बेल्हेकर, बाळासाहेब बेल्हेकर उत्तम फुले, राजेंद्र शिंदे, विनायक बेल्हेकर, सोमनाथ व्यवहारे, शुभम शिंदे, निखिल जपकर ,कारभारी जपकर ,संतोष जपकर, गोरख जपकर, संतोष बेल्हेकर ,नसीर सय्यद व पंचक्रोशीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विजय उमेदवारांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डिले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles