Sunday, December 8, 2024

सावधान! गुगलवर चुकूनही असे शब्द सर्च करू नका, अन्यथा ठरलेली आहे तुरुंगवारी

जगभरातील जवळपास लोकापर्यंत इंटरनेटचं जाळं पोहोचलं आहे. अभ्यासातील अवघड प्रश्न किंवा मनोरंजन अशा सर्व गोष्टींसाठी इंटरनेटचा आधार घेतला जातो. मात्र, गुगलवर काही शब्द सर्च करणे कटाक्षाने टाळले पाहिजे. इंटरनेटवर काही चुकीचे शब्द सर्च केल्याने तुरुंगवारीही भोगावी लागू शकते
गुगलवर सर्वच बाबींची माहिती एका क्लिकवर मिळते. मात्र, बेकायदेशीर मजकूर शोधल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यातही सापडू शकता.

बेकायदेशीर मजकूर सर्च केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. उदाहरण सांगायचं झालं तर गुगलवर बॉम्ब बनविणे आणि घरात बंदूक तयार करणे असं सर्च करणं महागात पडू शकतं.भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कठोर कायदे आहेत. तुम्ही चुकूनही याबाबत मजकूर सर्च केल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. पोर्नोग्राफीच्या वेबसाइटवर काही मालवेयर असतात. या मालवेयरमुळे तुमचा लॅपटॉप, कॉम्पुटर किंवा मोबाईलमधील अकाउंट हॅक होऊ शकतं.
भारतात गर्भलिंग तपासणी करणे कायद्याने गुन्हा आहे. याच कारणासाठी तुम्ही गुगलवर सर्च करत असाल तर यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.

आजकाल बहुतांश कंपन्या ग्राहक सेवेच्या सुविधा देतात. अनेकदा युजर ग्राहक सेवेसाठी इंटरनेटवर संबंधित नंबर सर्च करतात. मात्र, याचा गैरफायदा काही जण घेतात.

काही जण इंटरनेटवर seo च्या मदतीने बनावट वेबसाईट तयार करतात. या वेबसाईटवर बनावट नंबर उपलब्ध असतात. या नंबरवर कॉल केल्यानंतर ग्राहकाची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे इंटरनेटवर कस्टमर केयरचा नंबर सर्च करणे टाळले पाहिजे.काही युजर इंटरनेटवर आजारावर उपचार करण्यासाठी औषधे सर्च करतात. काही युजर आजारपणात औषधांचं नाव सर्च करत असतात. त्यानंतर मिळालेल्या माहितीवर औषधे घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आजारावर अशा प्रकारची औषधे सर्च केल्याने तुरुंगवारी होणार नाही, मात्र या चुकीमुळे रुग्णालयात जायची वेळ येऊ शकते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles