मंगळवारी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील निवडणुकीची तयारी करण्यात येणार आहे. राज्यातील काही मोठ्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु झाली. भाजपचे दिग्गज नेते, मंत्री दिल्लीत बैठकीसाठी दाखल झाले आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत होणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. त्यात राज्यातील मंत्री आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लोकसभेचे रण लढण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात येणार आहे.
टिव्ही 9 वृत्तवाहिनीने सदर वृत्त दिले आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत अनेक खासदारांना विधानसभा निवडणुकीत भाजपने उतरवले होते.
भाजपचे धक्कातंत्र…राज्यातील ‘या’ दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार…
- Advertisement -