एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार की नाही, यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर एकनाथ शिंदे यांनी देखील स्वत: उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, असं अमित शाह यांनी सांगितले. मात्र एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय कळवला नाही, अशी सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे. आज मुंबईत पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार? दिल्लीतील बैठकीनंतर चर्चांना उधाण
- Advertisement -