Saturday, January 25, 2025

अजितदादांचे दिल्लीत वजन वाढलं….. पहिल्यांदाच खासदार झालेल्या सुनेत्रा पवार यांना ‘जनपथ’वर आलिशान बंगला… सोनिया गांधी, शरद पवार…

राज्यसभेच्या खासदार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ११ जनपथवर मिळालेला बंगला चांगलाच चर्चेत आला आहे. ऐरवी पहिल्यांदा खासदार झालेल्यांना श्रेणी ५ चा बंगला दिला जातो. मात्र सुनेत्रा पवार यांना पहिल्याच टर्ममध्ये श्रेणी ७ चा बंगला मिळाल्याने अनेक दिग्गज नेते त्यांचे शेजारी झालेत. दरम्यान, अलिखित नियमानुसार नेत्यांना बंगले हे त्यांच्या टर्म आणि ज्येष्ठतेनुसार दिले जातात. यंदा सुनेत्रा पवार यांना श्रेणी ७ चा बंगला देण्यात आला. यामुळे दिल्लीने शरद पवारांना शह देण्यासाठी अजित पवारांना ताकद दिल्याचे बोललं जात आहे. राजधानी दिल्लीत केंद्रीय कर्मचारी, खासदार, मंत्री, ज्येष्ठ नेते, न्यायाधीर आणि अधिकारी यांना सरकारी निवासस्थान मिळतं. या घरांची श्रेणी एकूण ९ प्रकारात मोडते. श्रेणी १ ते ४ ची घरं ही केंद्रीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिले जातात. श्रेणी ५ मध्ये सिंगल फ्लॅट असतो. हा फ्लॅट पहिल्यांदाच खासदार झालेल्या व्यक्तींना मिळतो. श्रेणी ६ मध्ये पहिल्यांदा खासदार किंवा त्याआधी मंत्री राहिलेल्यांना दिला जातो. तर श्रेणी ७ चा बंगला हा चार पेक्षा जास्त वेळा खासदार राहिलेल्यांना दिला जातो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles