बहुमत मिळाल्यानंतर आज दिल्लीत एनडीएची खलबत झाली. सत्तास्थापनेपूर्वी एनडीएच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक झाली. सर्व खासदारांना दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एनडीएलला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत आज बैठक होणार आहे.. या बैठकीला एनडीएचे घटक पक्षही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भाजपच्या सर्व विजयी खासदारांच्या व्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांनाही आज दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल या बैठकीला हजर राहणार आहेत..अजित पवार या बैठकीला जाणार नाहीत.