भाजपाने देशातील भाजपाशासित मुख्यमंत्र्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना मानाचं स्थान देण्यात आलं. बैठक मुख्यमंत्र्यांची होती. पण उपमुख्यमंत्री असूनही ते फोटोसेशनसाठी पहिल्या पक्तींत होते. याच फोटोची सध्या सगळीकडे चर्चा असून या बैठकीच्या रुपाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत मानाचं स्थान कायम असल्यांचं म्हटलं जातंय.
सध्या चर्चेत असलेल्या या फोटोत भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत. पहिल्या पंक्तित नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दिसत आहेत. या पहिल्या पंक्तित देशातील महत्त्वाच्या राज्यांचे मुख्यमंत्री बसलेले आहेत. याच रांगेत उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आलं आहे.