मोठ्या थाटामाटात नव्या संसदेचं उद्घाटन झाल. पण, याच नव्या संसदेच्या इमारतीला गळती लागल्याच समोर आल आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. मणिकम टागोर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘संसदेच्या बाहेर पेपर लीक होत आहेत आणि संसदेमध्ये पाणी लीक होत आहे. राष्ट्रपती वापरत असलेल्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळती होत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले आहेत.भारताच्या संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.https://x.com/newsSChaudhry/status/1818842541829112180