दिल्लीत पंतप्रधान मोदींबरोबर अजित पवारांची स्वतंत्र बैठक…चर्चांना उधाण

0
26

. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एनडीएच्या बैठकीनिमित्ताने दिल्लीला गेले होते. पण या बैठकीनंतर एक वेगळा घटनाक्रम बघायला मिळाला. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले. पण त्यांच्यासोबत अजित पवार बाहेर पडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळाच्या दिशेला निघाले तेव्हा अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास अर्धातासांनी अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबत अशोका हॉटेलच्या बाहेर पडले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.