शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज राजधानी दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवराज सिंह यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांनाही बदललं जाऊ शकतं, असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.देशाची लोकशाही हाच आमचा स्वार्थ आहे. त्यांचं काय करायचं ते त्यांनी करावं. जसं मध्य प्रदेशात शिवराज सिंह यांना बदललं गेलं. तसं नरेंद्र मोदींना पण बदलू शकतात. आज नाही तर उद्या जागा वाटप करावंच लागेल. त्यालाठी मी अनेकांना भेटेल. थंडी वाजते म्हणून मी स्वेटर घातला आहे. पण मी काही हुडी वगैरे घालून मी भेटणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
शिवराज सिंह यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांनाही बदललं जाऊ शकतं
- Advertisement -