राज्यात पेट्रोल डिझेलचे रोज नवीन दर जाहीर होत असतात. राज्यात आज पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. परंतु सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. जवळपास सीएनजी दर १.५० रुपयांनी महागले आहे.
आजपासून सीएनजीचे नवे दर लागू होणार आहे. १ किलो सीएनजीसाठी तब्बल ७८ रुपये मोजावे लागणार आहे. सीएनजीचे आधीचे दर ७३ रुपये ५० पैसे होते. हेच दर आता वाढले आहेत. तर PNG चे आधीचे दर ४७ रुपये होते. आता ते दर वाढून ४८ रुपये झाले आहेत.मुंबई आणि उपनगरात सर्वाधिक वाहने ही सीएनजी गॅसवर चालतात. जवळपास ५ लाखांहून अधिक खासगी वाहने सीएनजीवर चालतात.तर टॅक्सीदेखील ७० हजारांहून अधिक आहे. ऑटो ४ लाखांहून अधिक आहेत.जवळपास २ हजार ३०० हून अधिक बस सीएनजी गॅसवर चालतात. त्यामुळे आता वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. एकूण १० लाखांहून अधिक वाहने सीएनजीवर चालतात.
राज्यात पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. पुण्यात पेट्रोलची किंमत १०४,५१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०२ रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४८ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१ रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.१४ रुपये तर डिझेलची किंमत ९०.७० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.६६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.१७ रुपये प्रति लिटर आहे.