या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण बाईकवरुन येतात आणि एका दुकानाबाहेर थांबतात. यावेळी एक तरुण दुकानात ग्राहक असल्याचे भासवत येतो. आणि त्याच्याबरोबरचा तरुण मागेच गाडीवर थांबतो. पुढे तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, हा तरुण दुकानदाराला काहीतरी वस्तू मागतो आणि त्याची किंमत विचारतो. दुकानदाराने किंमत सांगितल्यानंतर हा तरुण पैसे कमी करण्यासाठी विनंती करताना दिसत आहे. यानंतर दुकानदार थोडे पैसे कमीही करतो. यावर हा तरुण मागे असलेल्या व्यक्तीकडे पैसे घेण्यासाठी जातोय असं नाटक करत जातो आणि तसाच त्याच्या गाडीवर बसून फरार होतो. https://x.com/gharkekalesh/status/1823573040665641139
दुकानदारांनो सावध रहा….चोरट्यांनी शोधला वस्तू लंपास करण्याचा नवीन मार्ग…व्हिडिओ
- Advertisement -