व्हिडीओत गृहिणीने सांगितल्यानुसार यासाठी तुम्हाला चांगला पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटोचा वरील थोडासा भाग गोलाकार कापून घ्या. इतर उरलेला भाग तुम्ही इतर पदार्थांसाठी वापरा. छोट्या भागाला टूथपेस्ट लावा. तुम्ही कोणतीही टूथपेस्ट वापरू शकता. टोमॅटोवर ही टूथपेस्ट पसरवा.
आता टूथपेस्ट लावलेल्या या टोमॅटोचं काय करायचं? तर हा टोमॅटो तुम्हाला तुमच्या त्वचेवर चोळायचा आहे. तुमची त्वचा जिथं काळवंडली आहे, तिथं हा टोमॅटो चोळा. महिलेने या व्हिडीओत तो हाताला चोळून दाखवला आहे. टोमॅटो जोपर्यंत त्वचेवर चोळता येतो तोपर्यंत तो चोळा. यानंतर पाण्याने हात धुवून घ्या. व्हिडीओ नीट पाहिला तर तुम्हाला परिणाम स्पष्ट दिसून येईल. सुरुवातीला हात काळा पडलेला दिसतो. त्यावर टॅनिंग झालेलं आहे. उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे. पण जसा टूथपेस्ट लावलेला टोमॅटो त्वचेला लावला तशी कमालच झाली. त्वचेवरील टॅनिंग दूर झालं, त्वचेचा रंग उजळला आणि त्वचा चमकदार दिसू लागली.टुथपेस्ट क्लिनिझिंगचं काम करतं आणि टोमॅटो मॉईश्चराईझरचं.