ढाकणे शैक्षणिक संकुल शेवगाव येथे नवीन MBA कॉलेजला मान्यता व प्रवेश सुरु
केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संगमनेर संचलित, ढाकणे शैक्षणिक संकुल राक्षी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून सुनिताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, शेवगाव या नावाने नवीन MBA कॉलेज सुरू होतआहे. सदरील महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचेशी संलग्नित असून आणि महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुंबई व ए. आय. सी. टी. इ. नवी दिल्ली मान्यताप्राप्त असून सदरील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष MBA या वर्गाला प्रवेश देणे सुरू आहे तरी 3 वर्षे कालावधीचे पदवी शिक्षण पूर्ण केलेले तसेच MBA CET दिलेले विद्यार्थी प्रथम वर्ष MBA अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याकरिता पात्र आहेत. संस्थेचे कोड 05644 असे असून विद्यार्थ्यांना सदरील महाविद्यालयाचा ऑप्शन कोड भरणे कामी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. एकनाथराव ढाकणे साहेब, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीकांत ढाकणे साहेब यांनी आवाहन केलेले आहे. याबरोबरच संस्था 2010 वर्षापासून राक्षी या ठिकाणी तंत्रशिक्षणाचे पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण उत्तम प्रकारे देत सोबतच समर्थ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे इलेक्ट्रिकल, वायरमन, फिटर, वेल्डर इत्यादी ट्रेड यशस्वीपणे सुरू आहेत. सदरील विविध अभ्यासक्रमांद्वारे परिसरातील विद्यार्थ्यांचा जिवनस्तर उंचावण्या कामी कार्यरत आहे, तरी परिसरातील आणि आसपासच्या तालुक्यातील सर्व MBA आणि इंजिनीयर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाचा ऑप्शन कोड भरणे कामी आवाहन करण्यात येत सदरील महाविद्यालयाचा कोड DTE Code 05644 असा आहे. प्रवेशासाठी’ ढाकणे शैक्षणिक संकुल ‘ ,राक्षी, शेवगाव या ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
शेवगाव ढाकणे शैक्षणिक संकुल येथे नवीन MBA कॉलेजला मान्यता व प्रवेश सुरु
- Advertisement -