Wednesday, April 17, 2024

वरच्या वर्गात ढकलगाडी बंद…पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार

आता पहिली ते आठवीची परीक्षा होणार आहे. गुणवत्ता नसेल तर यात विद्यार्थ्याला नापास करण्यात येणार आहे. मात्र, त्याचा पुरवणी परीक्षा देऊन पास होण्याची संधी देण्यात येणार आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या (आरटीई) कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु विद्यार्थ्यांना नापास मात्र करता येत नव्हते. आता नवीन शासन निर्णयानुसार विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडला तर त्याला नापास करावेच लागेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलणे बंद होणार आहे. जर विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याला जूनमध्ये पुन्हा पुरवणी परीक्षा देता येणार आहे.पाचवी ते आठवीसाठी एप्रिलमध्ये परीक्षा होईल. पाचवी व सहावीसाठी भाषा, गणित व परिसर अभ्यास तर सातवी, आठवीसाठी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांचे पेपर असतील. मूळ परीक्षेत ग्रेस गुण मिळूनही नापास झाल्यास जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी परीक्षा होईल. त्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. पुरवणी परीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्याला नापास होऊन त्याच वर्गात बसावे लागेल. पुरवणी परीक्षेतदेखील संबंधित विद्यार्थी नापास झाल्यास तो नापासच राहणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles