सरकार १ डिसेंबरपासून सिम कार्डच्या खरेदीसाठी नवीन नियम लागू करणार आहे. सुरुवातीला हे नियम १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार होते. पण, आता दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
जर तुम्ही नवीन सिम कार्ड खरेदी करणार असाल किंवा तुमचे जुने सिम बंद करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला पुढील काही नियम माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
सिम कार्डच्या नवीन नियमांनुसार, सिम विकणाऱ्या सर्व डीलर्सना व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक असणार आहे. एवढेच नाही तर डीलर्सना सिम विक्रीसाठी नोंदणी करणेही बंधनकारक असेल. सिम विकणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्याच्या पोलिस पडताळणीसाठी टेलिकॉम ऑपरेटर जबाबदार असतील. नियमांकडे दुर्लक्ष केल्यास १० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. कृपया लक्षात घ्या की, व्यापाऱ्यांच्या पडताळणीसाठी १२ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
जर एखाद्या ग्राहकाला त्याच्या जुन्या नंबरवर सिम कार्ड घ्यायचे असेल, तर त्याचे आधार कार्ड स्कॅन करणे आणि त्याचा डेमोग्राफिक डेटा जमा करणे अनिवार्य असणार आहे .
नवीन नियमांनुसार युजर्सना बल्कमध्ये सिम कार्डे दिली जाणार नाहीत. तसेच सिम कार्ड बंद केल्यानंतर ९० दिवसांच्या कालावधीनंतर ते सिम खरेदीसाठी येणाऱ्या दुसऱ्या युजर्ससाठी लागू करण्यात येईल.
नवीन नियमांनुसार सिम कार्डे बल्कमध्ये दिली जाणार नाहीत. त्यातूनही जर बल्कमध्ये सिम कार्डे खरेदी करायची असतील, तर ग्राहकांना बिजनेस कलेक्शन घ्यावे लागणार आहे. तसेच एका आयडीवर युजर फक्त नऊ सिम कार्डे घेऊ शकणार आहे.
सिम कार्डाच्या नवीन नियमांनुसार, सिम कार्डे विकणाऱ्या सर्व विक्रेत्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.