नगर : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेती विषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषी विषयाचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात यावा यासाठी मी नेहमीच आग्रही होतो. राज्यस्तरीय शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये बोलताना शालेय शिक्षणापासूनच कृषीचा शालेय शिक्षणात समावेश असावा यासाठी असलेला दूरदृष्टीचा विचार त्यांनी बोलून दाखविला होता. त्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर तसेच राज्य शासनाकडे वेळोवेळी विविध माध्यमातून पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेती विषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषी विषयाचा शालेय शिक्षणात समावेश करण्याचा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो, हा निर्णय येत्या काळात राज्याच्या तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणखी मजबूत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल, तसेच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासूनच शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन व्यावहारिक शेती करण्यासंबंधी अर्थाजन होऊ शकेल. यामुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील विद्यार्थ्यांना देखील शेती किंवा कृषी विषयक व्यवसायात गोडी निर्माण होईल असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी याप्रसंगी केले.