Sunday, December 8, 2024

Jio Plan 2024..दररोज मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट

Jio Plan 2024 जिओने प्रीपेड युजर्ससाठी वर्ष संपण्यापूर्वी ‘न्यू इयर प्लॅन’ लाँच केला आहे. या प्लॅनची दैनंदिन किंमत फक्त 8.21 रुपये आहे. Happy New Year 2024 प्रीपेड प्लॅनअंतर्गत कंपनी स्वतंत्रपणे 24 दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे. म्हणजेच तुम्हाला 365+24 दिवसांचा प्लॅन मिळेल. न्यू इयर प्लॅनअंतर्गत ग्राहकांना 356 दिवसांसाठी दररोज 2GBडेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. जिओच्या इतर प्लॅन्सप्रमाणेच ज्यांना जिओ वेलकम ऑफरचा फायदा मिळाला आहे त्यांना अनलिमिटेड 5G इंटरनेट मिळणार आहे. कंपनीच्या वेबसाईटनुसार, न्यू इयर प्लॅन 2024 20 डिसेंबरपासून लाईव्ह झाला आहे. यापूर्वी कंपनीने 3,227 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला होता, ज्यामध्ये कंपनी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे सब्सक्रिप्शन फ्री देत आहे. या प्लॅनसोबत जिओ सिनेमा, क्लाऊड आणि जिओ टीव्हीचा फायदा मिळतो. यामध्ये कंपनी दररोज 2 GB डेटा देते. जिओच्या वेबसाईट किंवा अॅपच्या माध्यमातून तुम्ही हा प्लॅन ऑनलाइन खरेदी करू शकता.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles