Saturday, January 25, 2025

पित्याच्या मृत्यूच्या धसक्याने 9 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू ,नगर जिल्ह्यातील घटना…

नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने दुसर्‍या दिवशी मुलीनेही प्राण सोडल्याची हृदयकारक घटना घडली. बाळासाहेब गेणदास जाधव (वय 38) व श्रद्धा बाळासाहेब जाधव (वय 9) असे बापलेकीचे नाव आहे. बाळासाहेब जाधव हे किडनीच्या आजाराने नगर येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असताना शुक्रवार 29 नोव्हेंबरला निधन झाले. मात्र वडीलांच्या निधनाचा चिमुकल्या श्रद्धा हीने धसका घेतल्यामुळे शनिवारी दुसर्‍या दिवशी तीने प्राण सोडला.

शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.वडीलांच्या निधनाचा धक्का बसल्तामुळे श्रद्धाला श्रीरामपूर येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रात्री 12:30च्या दरम्यान उपचारादरम्यान तीचेही निधन झाले. श्रद्धा ही शिरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. बाप-लेकीच्या निधनाच्या या घटनेमुळे शिरेगावबरोबर मुळाकाठ परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. बाळासाहेब शेतकरी कुंटुबातील असून शेती व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई व दोन भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles