Tuesday, April 23, 2024

राज्यात भाजप प्रवेशासाठी रीघ, नगर परिषद मात्र दिग्गजांची भाजपला सोडचिठ्ठी…गडाखांची जादू…

भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे यांनी भाजपच्या सर्व पदांचा त्याग करत भेंडा (नेवासा) येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख गटात प्रवेश केला. नेवासा तालुक्यात भाजपमध्ये नियुक्त्यांवरून कुरघोड्या सुरू असतानाच काळे यांनी गडाख गटात प्रवेश केल्याने भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना हा मोठा राजकीय हादरा मानला जातो. या घडामोडींमुळे गडाख यांच्यासाठी आगामी राजकारणाला मोठे बळ मिळत असल्याचे दिसत आहे. दत्तात्रय काळे यांच्यासह भेंडा बुद्रुकचे उपसरपंच पंढरीनाथ फुलारी, देवगावचे सरपंच विष्णू गायकवाड, देवगावचे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काळे, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, महेश गायकवाड, गणेश गायकवाड, सरपंच सोपानराव लोखंडे, तुकाराम दामोदर कोलते यांनीही गडाख यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. देशासह राज्यात भाजपमध्ये अनेकजण प्रवेश करत असताना नेवासा तालुक्यात मात्र भाजपला लागलेली ओहोटी चर्चेचा विषय ठरत आहे. खुपटी, शिंगवे, नेवासा बुद्रुक, भानासहिवरे, शनि शिंगणापूर, कुकाणासह अनेक निष्ठावान भाजप कार्यकर्ते गडाख गटात सामील झाले आहेत. त्यामुळे नेवासा तालुक्यात भाजपमध्ये स्थानिक नेतृत्वाविरोधात तीव्र नाराजी दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काळे यांचा भेंडा, कुकाणा, चांदा गटात मोठा लोकसंपर्क आहे. सन २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काळे यांनी मोठी भूमिका बजावली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles