नगर : वाकडी (ता. नेवासे) दुर्घटनेतील दुर्दैवी कुटुंबातील वारसांना लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपताच राज्य शासनाकडून मदत दिली जाईल, असे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेत वाकडी जवळील काळेवस्ती येथे विषारी वायूने बेशुद्ध पडून व विहिरीच्या गाळात रुतून पाच जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन काळे व पवार कुटुंबाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भेट घेतली व सांत्वन केले.
दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना धीर देताना मंत्री विखे यांनी प्रशासनाला तत्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सरकारकडून होणारी मदत निवडणूक आचारसंहिता संपताच तत्काळ दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब फुलारी, नितीन दिनकर, दीपक पटारे, सचिन देसरडा, अंकुश काळे, ऋषिकेश शेटे, प्रताप चिधे, आदिनाथ पटारे, शिवसेनेचे अॅड. कारभारी वाखुरे, भाऊसाहेब वाघ, प्रकाश निपुंगे उपस्थित होते.