अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या व्हाईस चेअरमन पदी निखिल नहार यांची बिनविरोध निवड
अहिल्यानगर : अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या व्हाईस चेअरमन पदी निखिल नहार यांची संचालक मंडळांनी एकमताने निवड करण्यात आली, यासाठी सूचक मा. व्हाईस चेअरमन डॉ भूषण अनभुले तर अनुमोदन संचालक सुजित बेडेकर यांनी दिले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी काम पाहिले, यावेळी बँकेचे चेअरमन सीए गिरीश घैसास, माजी व्हॉइस चेअरमन डॉ. भूषण अनभुले, ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा, डॉ. विजयकुमार भंडारी, अशोक कानडे, सुजित बेडेकर, संजय घुले, शिवाजी कदम, जयंत येलुलकर, दत्तात्रय रासकोंडा, संचालिका रेश्मा आठरे, स्वाती कांबळे, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश लोखंडे, सीनियर ऑफिसर प्रकाश वैरागर, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी विक्रम मुटकुळे आदी उपस्थित होते
यावेळी नूतन व्हाईस चेअरमन निखिल नहार यांना बँकेचे अध्यक्ष सीए गिरीश घैसास व संचालक मंडळांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी नूतन व्हाईस चेअरमन निखिल नहार म्हणाले की बँकेचे चेअरमन गिरीश घैसास व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेची वाटचाल प्रगतीकडे सुरू आहे माझ्यावर विश्वास ठेवून मला व्हाईस चेअरमन पदावर काम करण्याची संधी दिली असून त्या पदाच्या माध्यमातून बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम करण्यासाठी प्रयत्न करीन व मिळालेला पदाला न्याय दिला जाईल, अहमदनगर शहर सहकारी बँकेचा नगर जिल्ह्यात असलेला नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करीन असे ते म्हणाले