Thursday, September 19, 2024

कुख्यात गुंड निलेश घायवळ अन् भाजप आमदार राम शिंदे एकत्र देवदर्शनाला व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विट केला होता. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता निलेश घायवळ सोबत आमदार राम शिंदे यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेत सोबत फिरतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय. नागपंचमी निमित्ताने जामखेडच्या नागेश्वराची यात्रा असते. या यात्रेत गुंड निलेश घायवळ आणि भाजप आमदार राम शिंदे एकत्रित दिसून येत आहेत. निलेश घायवळवर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles