Tuesday, April 23, 2024

लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का,आ.नीलेश लंके पुन्हा शरद पवार गटात ?

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लंके सध्या पवारांच्या भेटीला पोहचले असून आज ते पक्षात प्रवेश करणार, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यापार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मतदारसंघावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. अशातच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आमदार निलेश लंके निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

अहमदनगरमध्ये सध्या निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स लागले असून यावर लंके यांचा दमदार आमदार-फिक्स खासदार, असा उल्लेख करण्यात आला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील निवडून आले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची देखील मोठी ताकद आहे.त्यामुळे शरद पवार गटाने या जागेवर उमेदवार देण्यास तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निलेश लंके यांना अजित पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी हवी होती. मात्र, महायुतीत ही जागा भाजपच्या वाटेला जात असल्याने निलेश लंके नाराज झाले. त्यामुळेच त्यांनी शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतलाय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles