Saturday, January 18, 2025

लोकसभा लढवणार, राणी लंके यांचा पुनरूच्चार, ‘शिवस्वराज्य’ यात्रेची सांगता

अहमदनगर: लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे नगरचे राजकीय वातावरण चांगलंच तापत असल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आणि खासदार सुजय विखे यांच्यातील राजकीय वादाला धार येताना दिसत आहे. निलेश लंके यांच्या पत्नी या नगरमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यासाठी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. पण स्वत: काढलेल्या या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला मात्र त्यांनी उपस्थिती लावली नसल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेची आज सांगता झाली. अहमदनगरच्या शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यात्रेची सांगता झाली. विशेष म्हणजे ज्यांच्या संकल्पनेतून ही यात्रा काढण्यात आली ते आमदार निलेश लंके हेच या यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला गैरहजर राहिले.

नगरच्या शक्कर चौक ते माळीवाडा बस स्थानकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या युवक-युवतींनी सहभाग घेतला. आमदार निलेश लंके यांची पत्नी राणी लंके यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी या मिरवणुकीवर 25 जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सांगता करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles