पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटातून परतलेले आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेतली.
पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले होते. ते अहमदनगर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी झाले.
अहमदनगरमधून लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. देशात लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर केली जात आहे. कालच भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केली. निलेश लंके यांना अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र अजित पवार ज्या महायुतीत आहेत, त्यामध्ये नगरची जागा भाजपकडे गेली आहे, त्याठिकाणी भाजपने सुजय विखे यांना पुन्हा तिकीट दिलं आहे. त्यामुळे नाराज असलेले निलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात प्रवेश केला.
देशामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या आणि विकासाच्या घटना घडल्या आहेत त्यामागे शरद पवार यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मला माझी 2019 ची विधानसभेची निवडणूक आठवते. माझ्या तेव्हाच्या प्रचाराची सुरुवात शरद पवारांनी केली होती. कोरोना महामारीत भाऊ-भावाला विसरले. शरद पवारांची एक अदृश्य ताकद मला लाभली आहे. कोरोना काळात मी संघर्ष करत असताना ज्या घटना घडल्या त्या मी विसरु शकत नाही. त्या पुस्तकाचं नाव मी अनुभवलेला कोविड असं आहे. या पुस्तकात सर्व घटना लिहिल्या आहे. त्यांच्या हातून पुस्तकाचं प्रकाशन व्हावं अशी इच्छा होती. मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी विनंती मान्य केली”, असं निलेश लंके म्हणाले.विचारधारा आणि पक्ष एकच आहे. मी शरद पवारांना कधी सोडलं नाही. माझ्या प्रत्येक कामात शरद पवार यांचा फोटो आहे. शरद पवार आमच्या हृदयात आहेत. खासदारकी आणि कुठल्या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली नाही”, असं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं.