राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाच्या वतीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहिर झाल्यानंतर शनिवारी रात्री उशीरा सुदर्शन बंगला, संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेबांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नगर दक्षिणच्या निवडणूकीत पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. तसेच निवडणूकीसाठी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले.
तसेच नगर दक्षिणची निवडणूक ही श्रीमंतांच्या विरोधात गरीब जनता अशी होणार असून या लढ्यात गोरगरीब जनता जिंकणार आहे आणि विखेंना आता पराभवाची सवय लागली असून तुझा विजय होईल असे उद्गार त्यांनी काढले. याप्रसंगी माझे अगदी घरच्यासारखे स्वागत करुन मला आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
उमदेवारी जाहीर होताच निलेश लंकेंची खलबतं; मध्यरात्री घेतली बाळासाहेब थोरातांची भेट
- Advertisement -