Sunday, July 21, 2024

खासदार निलेश लंके यांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ !

अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली आहे. निलेश लंके हे सध्या पुणे दौरा करत आहे. या दौऱ्यादरम्यानच त्यांनी गजा मारणेची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, निलेश लंके गजा मारणेला का भेटले? या भेटीमागचं कारण काय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

गजा मारणे याच्यावर पुणे आणि परिसरातून विविध गुन्हे दाखल आहेत. खंडणी, खुनाचा प्रयत्न, मोक्का आणि अपहरण अशा अनेक गुन्ह्यांमध्ये गजा मारणे आरोपी आहे. तो अनेक वर्ष तुरूंगात देखील होता. त्यामुळे त्याच्यावर नेहमी टीका होत असते. नुकतंच पोलीस आयुक्तांनी गुंडांची झाडाझडती घेतली होती, त्यामध्ये गजा मारणेचा देखील समावेश होता, अशा एका गुंडाची भेट घेतल्यामुळे निलेश लंके चर्चेत आले आहेत.

लोकसभेत निवडून आल्यानंतर निलेश लंके सध्या पुणे दौरा करत आहेत. या दरम्यान ते वेगवेगळ्या लोकांना भेटत आहे. अशातच त्यांनी गजा मारणेची भेट घेतली आहे. लोकसभेत निवडून आल्यानंतर निलेश लंकेंनी हा सत्कार स्विकारला आहे. या भेटीमुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार अन् निलेश लंके चर्चेत आले आहेत.

काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती, त्यावेळी तुतारी गट आक्रमक झाला होता. त्यानंतर अजित पवार यांनी चूक मान्य केली होती. आज मात्र निलेश लंकेंनी गजा मारणेच्या घरी जावून सत्कार स्विकारला. आता यावर लंके काय स्पष्टीकरण देणार, असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.

याबाबत स्वत: निलेश लंकेंनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी हाणामारी झाली, त्याचा संबंध गजा मारणेपर्यंत जातो का, याचा शोध घेतला पाहिजे. या भेटीबाबत लंकेंच्या स्पष्टीकरणाची वाट बघत असल्याचं मिटकरी म्हणाले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles