नगर (अहिल्यानगर) येथे न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर नगर येथे रुग्णालयात उपचार सुरु आहे. माजी आमदार निलेश लंके यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील ॲड राजाराम आढाव व त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. कायद्याची सेवा आणि रक्षण करणाऱ्यांवर अशा पद्धतीने होणारे हल्ले अतिशय चिंताजनक असून मी या प्रकाराचा जाहिरपणे निषेध करतो. अॅड अशोक कोल्हे यांची तब्येत आता हळूहळू सुधारत असून ते लवकरच ठणठणीत बरे होऊन आपल्या कामावर परत येतील हा विश्वास लंके यांनी व्यक्त केला. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, संभाजी कदम उपस्थित होते.
- Advertisement -