पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षानी स्वीकारला. पारनेरची आमदारकीची जागा आता रिक्त. अधिसूचना प्रसिद्ध.
विधानसभा निवडणुकीला कमी कालावधी राहिला असल्याने तेथे पोट निवडणूक होऊ शकणार नाही. शिवाय कालावधी पूर्ण होण्याआधी राजीनामा दिल्यास पेन्शन मिळू शकत नाही.
यंदाच्या २०२४ च्या लोकसभेला ते शरद पवार गटाकडून निवडणुकीस उभे राहिले. भाजप उमेदवार खा. सुजय विखे यांच्याशी त्यांचा सामना झाला. येत्या ४ जून ला निकाल लागेलच. परंतु आता त्यांच्या आमदारकीबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा लोकसभेला उभे राहण्याआधी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला होता.
त्यांचा हा राजीनामा १० एप्रिल रोजी अध्यक्षांनी स्वीकारला आहे. म्हणजेच आता निलेश लंके हे आमदार राहिले नाहीत. आता त्याबाबतच एक आणखी महत्वाची माहिती समजली आहे की, निलेश लंके यांना आपल्या आमदारकीची पेन्शन मिळणार नाही. प्रत्येक आमदाराला ही पेंशन मिळत असते. परंतु निलेश लंके याना ती मिळणार नाही.निलेश लंके यांना आमदारकीची पेन्शन मिळणार नाही. त्याचे कारण असे की, त्यांनी आपल्या आमदारकीचा कार्यकाळ संपूर्ण पूर्ण केला नाही. त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला. त्यामुळे हा कार्यकाळ पूर्ण होऊ न शकल्याने त्यांना पेन्शन मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.