Monday, June 17, 2024

नीलेश लंकेंचा मोठा गौप्यस्फोट म्हणतात….मला सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी

मला सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याचा नीलेश लंकेंचा गौप्यस्फोट; विजय आपलाच असल्याचा दावा!
शेवगाव- – मला लोकसभेच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी मदत केली असल्याने मी सर्वपक्षीय कार्यकर्ता असून, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी निवडणुकीनंतर आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ते त्यांनी करू नयेत, अन्यथा ४ जूननंतर सर्व हिशोब चुकता केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा खणखणीत इशारा अहमदनगर लोकसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथे युवानेते राजेंद्र दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नीलेश लंके बोलत होते.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व केदारेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, शिवशंकर राजळे, ज्येष्ठ नेते दिनकर पालवे, शिवसेना नेते रामदास गोल्हार, रफिक शेख, केदारेश्वर कारखान्याचे संचालक श्रीमंत गव्हाणे, गहिनीनाथ शिरसाट, भाजपचे बंडू रासने, शेवगाव बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, युवानेते नंदकुमार मुंडे, शिरीष काळे, बोधेगावचे उपसरपंच संग्राम काकडे, मयूर हुंडेकरी, बालमटाकळीचे उपसरपंच घोरपडे, शिंदे गटाचे शेवगाव तालुका अध्यक्ष साईनाथ आधाट, नामदेव कसाळ, वंचित आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर, नवनाथ खेडकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. राजेंद्र दौंड यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या तर माजी आ. नीलेश लंके म्हणाले, की पैसे कमविण्यापेक्षा जीवाभावाची माणसं सोबत असली तर जीवनात काही कमी पडत नाही. मी प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य जनतेला नेहमी भरीव मदत केली आहे. माझी प्रस्थापितांच्या विरोधात लढाई सुरू आहे. लोकसभेत चारपिढ्या राजकारण करणार्‍यांच्या (सुजय विखे यांचे नाव न घेता) मोठ्या लोकांच्या विरोधात लढणे हे सोपे काम नव्हते, पण जिवाभावाचे सामान्य लोक व सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच अनेक नेत्यांनी मला निवडणुकीत भरीव मदत केली असल्याने मोठ्या फरकाने विजय होणार असल्याचे लंके यांनी जाहीरपणे सांगून, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आभारी असल्याचे ते म्हणाले. मला असंख्य अदृश्य राजकीय शक्तीने मदत केली आहे, कोणी कोणी मदत केली आज जाहीर करणार नाही पण निकालानंतर सर्व कळणार आहे, असेही लंके म्हणालेत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles