नगर शहराला चांगल्या शहराचा दर्जा देण्याचा मी शब्द देतो. शहरातील एमआयडीसीची दुरावस्था का झाली ? आमच्या भागात एमआयडीसीची उभारणी झाल्यानंतर मी काळाची पाऊले ओळखून उद्योजकांना संरक्षण दिले.स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यामुळेच नगर पुण्यापेक्षा सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून सुपा एमआयडीसीकडे पाहिले जाते. कुंपणाने शेत खाल्ले अशी परिस्थिती होऊ दिली नाही. नगरमध्ये राजकीय माणसांनी विळखा घातल्याने आज ही अवस्था झाली. सुपा एमआयडीसीच्या बरोबरीने नगरची एमआयडीसी उभी करण्यासाठी पुढाकार घेऊ.
नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील भिस्तबाग परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत यावेळी मा. मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ. दादाभाऊ कळमकर, घनश्याम शेलार, जयंत वाघ, मा. महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, किरण काळे, बाळासाहेब हराळ यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
सुपा एमआयडीसीच्या बरोबरीने नगरची एमआयडीसी उभी करण्यासाठी पुढाकार घेणार: निलेश लंके
- Advertisement -